भुसावळ प्रतिनिधी । शहरातील ईदगाह मैदानावर आज सकाळी पावसासाठी सामूहिक नमाज पठनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जून महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातच भुसावळ शहराला या वर्षी अतिशय भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे जोरदार पाऊस येऊन सर्वत्र सुख-समाधान नांदावे यासाठी आज शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले. यात पावसासाठी दुआ मागण्यात आली.
पहा : सामूहिक नमाज कार्यक्रमाचा व्हिडीओ.