मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीत गेल्या तीन महिन्यांपासून सरपंच निवडीसाठी निवडणूक होण्याची बाकी होते. दरम्यान, बुधवारी २४ जुलै रोजी सर्वसाधान महिला राखीव सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सरपंचपदी सुपडाबाई भालेराव यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २४ जुलै रोजी सकाळी ही निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक मंडळाधिकारी मुंडे व तलाठी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित घेण्यात आली. सदर निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मधील सदस्या सुपडाबाई रघुनाथ भालेराव यांनी गावातील सर्व पक्षीय पैनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना एकूण ९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केले त्यात गोपाल कृष्ण न्हावी, भगवान चुडामन भिल. विशाल पंडित पोहेकर, प्रमिलाबाई मनोहर पाटील , ललिता संजय कोळी, पुताबाई लक्ष्मण भिल आणि स्वतः सुपडाबाई रघुनाथ भालेराव असे मतदान झाले असून त्यात त्यांची नायगांव/कोठे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच जागेवर निवड झाली.