चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कुरक्षेत्र मतदारसंघाचे खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी हे हरियाणा राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हा निर्णय आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ते मनोहरलाल खट्टर यांचे जवळीक मानले जातात. सैनी ओबीसी समाजातून येतात. त्यांना मागील वर्षी हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
हरियाणामध्ये भाजप आणि जननायक जनता पार्टीच्या आघाडीचे सरकार होते. पण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांनी आघाडी तोडली. त्यानंतर खट्टर यांनी सकाळी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेजेपीचे दहा आमदार सरकारमधून बाहेर पडले. मात्र, पक्षाला सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा राज्यात स्थापन होणार आहे.