नागपूर वृत्तसंस्था । सुधिर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरुन हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. नागरिकत्व दुरूस्ती कायदा घटनाबाह्य आहे, यांची अंमलबजावणी करू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करण्यात येणार आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणारी लाठीमार आम्ही खपवून घेणार नाही, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आणि महाविकास आघाडीत चांगला गदारोळ झाला. अशोक चव्हाण यांच्या विधानावर आक्षेप घेत माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारताच्या संसदेने पारीत केलेल्या कायदा बेकायदेशीर कसा असू शकतो. हे ठरविण्याचा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे हा केंद्राचा कायदा आहे, त्याला तुम्ही किंवा आम्ही बेकायदीर आल्याचे म्हणू शकत नाही.