काँग्रेसच्या महारॅलीसाठी सजली नागपुरनगरी

नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा |  काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने उद्या नागपुरात महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. ४० एकर जागेवर या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण नागपूर आहे. जागोजागी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या महारॅलीला प्रचंड गर्दी होणार असल्याचं दिसत आहे. या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यासारखे दिग्गज नेते रॅलीसाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

नागपुरात उद्या होणाऱ्या या महारॅलीच्या सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आलं आहे. सभेच्या ठिकाणी तीन भव्य स्टेज उभारण्यात आले आहेत. या स्टेजवर देशभरातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री बसणार आहेत. सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपूरात येणार आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मैदानावर जाऊन सभेचा आढावा घेतला. तसेच संबंधितांना काही सूचनाही केल्या आहेत. ही सभा करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. या सभेच्या माध्यमातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकलं जाईल. त्यामुळे या रॅलीत काँग्रेस नेते काय वक्तव्य करता याकडे सर्वाचे लक्ष राहील.

 

Protected Content