नागलवाडी येथील बंधाऱ्याचे नामकरण व जलपूजन उत्साहात

nagalwadi

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील नागलवाडी गावात व परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने संपुर्ण नदी, नाले, बंधारे ओव्हर फ्लो वाहत आहे. आज पाण्याचे जलपुजन व बंधाऱ्यांचे नामकरण विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते करण्यात आले.

बंधाऱ्याचे नामकरण
नागलवाडी गावात चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांची पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रष्ट , अखिल भारतीय जैन संघटना, महाराणा प्रताप नागरी पतसंस्था व नागलवाडी ग्रामस्तांतर्फे नाला खोलीकरण केलेल्या बंधाऱ्याचे जलपुजन करुन त्या बंधाऱ्यास नागलवाडी गावाचे वैभव असलेले कर्मयोगी दानशुर कै. हुकुमसिंग झेंडु राजपुत यांचे नामकरण ‘धोंडु नाना बंधारा’ असे करण्यात आले.

धोंडु नाना म्हणजे तालुक्यात सुप्रसिद्ध असे एक व्यक्तीमत्व होते. नाना कधीही जात पात न पाहता गोरगरीब गरजु लोकांची रात्री अपरात्री मदत करत असत. त्याकाळी गावात डाँक्टर नव्हते त्यावेळी नाना रोज संध्याकाळी स्वखर्चाने औषद रूग्णांना मोफत वाटप करत असत . गावात ओला सुका दुष्काळात गरीबांना धान्य वाटप करत असत. गावात आलेले साधु संत, कलाकार, शासकीय अधिकारी नाना कडे नेहमी येण जाण असायच त्यांना देखील खाली हात जाऊ देत नव्हते . त्यांच्या कार्याचा गावाला विसर पडु नये व येणाऱ्या पिढीला प्रेरणा प्रोहत्साहन मिळावे यासाठी या कर्मयोगीचे नाव देण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. नंतर बोरअजंटी वराड रस्त्यालगत माळी रावसाहेब, डॉ. नरेंद्र शिरसाठ, यशवंत पाटील, बाळु सर, सुलताने भाउसाहेब व शेतकरी मिळुन केलेल्या माती बांधचे देखील जलपुजन करण्यात आले.

Protected Content