ना. हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन

javale 1

फैजपूर प्रतिनिधी । ना. हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश आलेल्या असून मंजुर झालेल्या रस्तांच्या कामाचे भूमिपूजन उद्या दि. १ सप्टेंबर रोजी हरिभाऊ यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल ते भुसावळ रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. यावल तालुक्यातील ५०० लक्ष आणि दोनगाव, इचखेडा, वाघझीरा, वड्री, परसाळे, यावल, अट्रावल, भालोद, आमोदा रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. तसेच येथील ३०० लक्ष (भाग-यावल ते अट्रावल व हरिपुरा ते वड्री) या कामांचे भूमिपूजन ना. हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसापासूनची मागणी ग्रामस्थांची पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ उपस्थितीत राहणार आहेत.

 

Protected Content