सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे एन.मुक्टो स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारणीची निवड नुकतीच संपन्न झाली त्या पार्श्भूमीवर आयोजित सभेत एन.मुक्टोचे केंद्रिय सहसचिव डॉ.विजय सोनजे यांनी एम.फुक्टो ने दिलेल्या निर्देशानुसार एन.मुक्टो आता रस्त्यावर उतरणार, आंदोलनाच्या तयारीला लागा असे आवाहन केले.
एन. मुक्टो ही अखिल भारतीय स्तरावर व्यापक जनाधार असलेली सर्वात मोठी बुद्धिजीवी प्राध्यापकांची संघटना ए.आय.फुक्टो व महाराष्ट्रात एम.फुक्टो सी संलग्नित संघटना आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांवर वर्षानुवर्ष ही संघटना आवाज उठवत आहे. आतापर्यंतचे सर्व वेतन आयोग आणि पदोन्नती तसेच, पद मन्यतेपासून ते पदस्थापने पर्यंत अनेक बाबींवर संघटनेचे बारीक लक्ष असते, संघटनेत अभ्यासू लोकांची परंपरा आहे.
कोणतेही राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारांच्या बाजूने न झुकता फक्त प्राध्यापकांचे हित या एकमेव उद्देशाने संघटना काम करत आलेली आहे, आता जुनी पेंशन योजना, पीएच.डी.वेतनवाढ, कॅस अतंर्गत पदोन्नती देण्यात झालेले विलंब, एकूण रिक्त पदांच्या 90% भरती करण्याचा कायदा असताना सुध्दा मुद्दाम रखडलेली पद भरती प्रक्रिया, उच्च शिक्षित बेरोजगार प्राध्यापकांना तोडक्या पगारात केवळ नऊ महिन्यासाठी मिळणारी अन्यायकारक नियुक्ती, घड्याळी तासिकांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कायम नियुक्ती द्यावी, अश्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे टप्पे घोषित करण्यात आले आहेत. त्यासाठी तन-मन-धन अर्पण करून लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन डॉ.सोनजे यांनी केले.
प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.एस.पी.मगर यांनी ही संघटनेचे आजि-माजी पदाधिकारी यांनी केलेल्या संघर्षामुळे आज अनेक लाभ मिळात आहेत. त्याची परत फेड करायची असेल तर येणाऱ्या पिढीच्या हक्कांसाठी आपल्यातील प्रत्यकाने लढले पाहिजे, संघटनेची ताकद काय हे यापूर्वी आपण सिध्द केले आहे या पुढे ती तशीच टिकवून लढत राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी व विद्यापीठाचे आदिसभा सदस्य डॉ.पी.डी.पाटील यांनी ही येणारा काळ खूप संघर्षाचा आहे त्यासाठी आपण तेवढ्याच ताकदीने सज्ज झाले पाहिजे असे सांगत नियोजित आंदोलनाचे सर्व टप्पे आपण यशस्वी करून दाखवू असा विश्वास दिला.
प्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी छोटी मोठी अमिषे दाखवून प्राध्यापकांमधे फूट पाडूणाऱ्यां चापलुसाना नियती कधीच माफ करणार नाही अश्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे असा संकल्प करत अश्या प्रवृत्तींचा निषेध केला व मोठ्या जल्होषात एन.मुक्टो जिंदाबादचा नारा देत एकसंघ राहून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.
प्रसंगी सूत्र संचालन फैजपूर शाखेचे प्रसिद्धीप्रमुख कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत व आभार सचिव डॉ.ताराचंद सावसाकडे यांनी मानले. सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते