‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे

बुलढाणा प्रतिनिधी । कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात  राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम  बुलढाणा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी,  असे  पालकमंत्री  डॉ राजेंद शिंगणे यांनी सांगितलं. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह बुलढाणा  जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.  नागरिकांना आव्हान करताना सांगितले की, आपण स्वतः आपले व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, जेणे करून आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोना ची बाधा होणार नाही, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडाला मास लावणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, हात वारंवार सॅनिटायझ करणे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. किमान आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी हातभार लागेल. असे आव्हान यावेळी केले..

 

 

 

 

 

Protected Content