जळगाव प्रतिनिधी । मविप्रच्या वार्षीक सर्वसाधारण सभेची पुर्वतयारी करण्यासाठी सभासदांची बैठक सुरु असतांना निलेश भोईटेंसह 20 ते 25 जणांनी मविप्रच्याकार्यालयात येवून संस्थेचे संचालक महेश आनंदा पाटील यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी भोईटे गटाविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मविप्र संस्थेचे संचालक महेश आनंद पाटील (वय 46) रा. कुवारखेडा ह. मू. साळुंखे बिल्डींग शिवाजी नगर हे इतर संचालकासह संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभाची पुर्व तयारी करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात बसल ेहोते. दरम्यान दुपारी 1 ते 2 वाजेच्यासुमारास निलेश रणजीत भोईटे, शिवाजी केशव भोईटे, निळकंठ शंकर काटकर, प्रकाश आनंदा पाटील, योगेश रणजीत भोईटे, रमेश दगडू धुमाळ, गणेश दगडू धुमाळ, पुण्यप्रताप दयाराम पाटील, सजय भिमराव निंबाळकर, सुनिल भोईटे यांच्यासह 10 ते 15 जणांनी संस्थेच्या आवारात बेकायदेशीर रित्या प्रवेश करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ ऐकूण कार्यालयात बसलेले मनोज पाटील, पियुष पाटील, शांताराम सोनवणे व इतर सभासद कार्यालयाबाहेर असता, भोईटे गटाकडून त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
लाठ्याकाठ्यांनी मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी
हरामखोर कोर्टात जातात का, कोर्टाचा निकाल नाचवतात का, एकदा तुम्हाला संपवून टाकू असे म्हणत महेश पाटील यांच्यासह इतरांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या हातातील लाठ्याकाठ्यांसह लाथाबुक्क्यानी त्यांच्याकडून मारहाण करण्यात आली.
पळ काढतांना केली दगडफेक
मारहाण करतांना पोलिस येण्याच्या आत याठिकाणाहून पसार व्हा असे सांगत भोईटे गटाने मुख्य प्रवेशद्वाराकउे पळ काढला. पळ काढत असतांना त्यांच्यातील काही जणांनी परिसरातील दगड उचलून फेकरण्यास सुरुवात केली. यामुळे सस्थेच्या परिसरात उभी असलेल्या काचा फुटल्या आहे. याप्रकरणी महेश पाटील याच्या फिर्यादीवरुन निलेश भोईटेंसह 20 ते 25 जणांवर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.