Home धर्म-समाज हनुमान मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम युवकांची मानवी साखळी !

हनुमान मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम युवकांची मानवी साखळी !


बेंगळुरू वृत्तसंस्था । काल बेंगळुरूतील आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. अनेक वाहने जाळण्यात आली. या आमदाराच्या घरासमोरच हनुमान मंदिर आहे. या मंदिराला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम युवकांनी मानवी साखळी तयार करून या मंदिराचे रक्षण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होऊ लागली.

पुलाकेशी नगरात मंगळवारी रात्री जमावाने पोलिस ठाणे आणि काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. या आमदाराच्या कथित निकटवर्तीयाने एका समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानंतर ही घटना घडली.

या फेसबुकपोस्टनंतर हिंसा मोठ्या प्रमाणावर भडकली. हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. तरीही हिंसक जमाव नियंत्रणात न आल्याने अखेर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound