डांभुर्णी येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथे शुक्रवार, २१ मार्च ते शुक्रवार, २८ मार्च २०२५ या कालावधीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात कलश यात्रा, काकड आरती, हरिपाठ आणि कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविक भक्तांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात २१ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता कलश यात्रेने होईल. दररोज सकाळी ५ वाजता काकड आरती, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तर रात्री ७:३० ते ११ वाजेपर्यंत कथा वाचन होणार आहे. या संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे कथा वाचक किशोरी मोहिनी दिदी (जळगाव) या असणार आहेत.

कार्यक्रमाच्या समारोप दिनी, २८ मार्च रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ह.भ.प. युवराज (नाना) महाराज दोंडाईचेकर यांचे काल्याचे कीर्तन, तसेच १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा संपूर्ण कार्यक्रम श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर, किनगाव रोड, डांभुर्णी येथे संपन्न होणार असून, आयोजकांनी परिसरातील पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Protected Content