जळगाव प्रतिनिधी । शहरातील कब्रस्थानजवळ एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कब्रस्थानच्या पुढे आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. याप्रसंगी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये हा मृतदेह शाम दीक्षित (वय ३२) या तरूणाचा असल्याचे आढळून आले. शाम हा महसूल खात्यातील खासगी कामे करत होता. तसेच तो एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची बाबसुध्दा समोर आली आहे. पोलीस तपासात शाम दीक्षित याने चार जणांसह शहरातील बसस्थानका जवळच्या एका हॉटेलमध्ये
पहाटे दोन वाजेपर्यंत मद्य प्राशन केले होते. यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्याच्या सोबत दारू पिणार्यांवर पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.