डोक्यात रॉड टाकून तरूणाचा खून; आरोपी ताब्यात

murder

धरणगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पाळधी येथे रात्री डोक्यात रॉड टाकून तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्‍वर गंभीर पाटील उर्फ मुकेश या तरूणाला बबलू (पूर्ण नाव माहित नाही) व बळीराम कुंभार (दोन्ही रा. पाळधी) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्याने याला नकार दिला. यामुळे या दोघांनी त्याला रॉडने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री उशीरा तालुक्यातील सोनवद ते पथराड रस्त्यावर घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content