Home Cities अमळनेर झाडी येथील तरूणाचा खून; परिसरात खळबळ

झाडी येथील तरूणाचा खून; परिसरात खळबळ

0
41

अमळनेर प्रतिनिधी। तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील झाडी येथील तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खबळ उडाली आहे.

अमळनेर तालुक्यातील झाडी गावापासून १ किमी अंतरावरील शेतात २४ वर्षीय अविवाहित युवकाचा खून झाला असल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली आहे. झाडीचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना या बाबत खबर दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील , पोलीस उपनिरीक्षक निलेश शेमळे, सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव , भागवत पाटील, पोलीस नाईक सुनिल अगोने, दिनेश कुलकर्णी हे त्वरित झाडी गावांतील सुभाष गोविदा पाटील यांच्या शेतात घटनास्थळी दाखल झाले. संबंधीत शेतमालकाचा मुलगा सुनील सुभाष पाटील वय २४ राहणार झाडी ता अमळनेर याचा शेतात असलेल्या मंजुबाचे मंदिरा शेजारीच खाटेवर धारदार हत्याराने घाव घालून तोंड ठेचून खून केल्याचे घटनास्थळावरून निष्पन्न झाले आहे तरी कुणी तरी अज्ञान व्यक्तीने त्यास खाटेवर मारून जमिनीवर पाडून मारल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, घटनास्थळी रक्ताने भरलेली गादी, बूट व एम एच १९- बी डब्ल्यू ३८९१ क्रमांकाचे होंडा शाईन ही गाडी आढळून आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound