जळगावात मर्डर : कुटुंबियांचा जिल्हा रूग्णालयात आक्रोश

murder of youth
जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये किरकोळ वादातून तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून मृत तरूणाच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केल्याने वातावरण हेलावल्याचे दिसून आले.

याबाबत वृत्त असे की, एम.जे. कॉलेजच्या पार्कींगमध्ये झालेल्या किरकोळ वादातून आज दुपारी एका तरूणावर चाकून वार करण्यात आले. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे (वय २१) हा एम.जे. महाविद्यालयात टि. वाय. बी. ए. या वर्गात शिकतो. तो आज आपल्या भावाचे अ‍ॅडमीशन घेण्यासाठी सकाळी आठ वाजताच काही मित्रांसह कॉलेजला आला होता. साधारणत: दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो पार्कींगमध्ये लावलेली आपली दुचाकी काढण्यासाठी आला. तेव्हा गाडी काढण्यावरून त्याचा एका तरूणाशी वाद झाला. यातून धक्काबुक्की करण्यात आली. हे सुरू असतांना समोरच्या तरूणांनी चाकू काढून त्याच्यावर सपासप वार केले. चाकूने हल्ला करून हल्लेखोर तरूणांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुकेशला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याआधीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून मृताच्या आप्तेष्टांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केल्याने वातावरण भावनिक बनल्याचे दिसून आले. किरकोळ कारणावरून थेट चाकूने वार करण्यात आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोर विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांनी महाविद्यालयाचा परिसर आणि जिल्हा रूग्णालयात बंदोबस्त लावला आहे.

Protected Content