यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा येथील यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रद्द करण्याच्या निर्णय यावल तहसीलदार महेश पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
दरवर्षी माघ महिन्याच्या दर शनिवार आणि सोमवारी रोजी यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा देवस्थान येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा ५ फेब्रवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय यावल तहसीलदार महेश पवार यांच्या दालनात सर्वानूमते घेण्यात आला आहे. या काळात भाविकांना फक्त देव दर्शन करता येणार आहे. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेच्या कालावधीत मंदीर खुले असणार आहे. यात्रोत्सवाच्या काळात नवस व प्रसादाचा कार्यक्रम करण्यास प्रशासनाकडून बंदी केलेली असल्यामुळे यावर्षी नवस देण्याचा कार्यक्रम मंदीर परिसरात कुठेही करता येणाना नाही. त्याच पध्दतीने मनोरंजनाची दुकाने, कटलरी दुकाने, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, हॉटेल आदी सर्व दुकाने लावण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. विनापरवानगी कुणीही दुकाने लावल्यास किंवा कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आले आहे.
या बैठकीला तहसीलदार महेश पवार, देवस्थानच्या नवनिर्वाचित अध्यक्षा राजश्री कोळी, उपाध्यक्ष विजय कोळी, पंकज कोळी, आकश कोळी, हितेश कोळी, हेमंत कोळी, समाधान कोळी, किशोर कोळी, निलेश कोळी, हिंमत कोळी, चेतन कोळी, पोलीस पाटील पवन चौधरी आदी उपस्थित होते.