Home Cities जळगाव महापालिका रणसंग्राम : उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी

महापालिका रणसंग्राम : उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. बुधवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. राजकीय पक्षांचे दिग्गज आणि अपक्ष उमेदवारांनी महापालिका प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

निवडणूक प्रक्रियेसाठी ‘टाईम स्लॉट’ निश्चित
निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार, अर्जांचे वितरण आणि स्वीकृती सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत केली जात आहे. केवळ याच वेळेत निवडणूक विषयक कामकाज सुरू असल्याने या चार तासांच्या कालावधीत महापालिका परिसरात राजकीय नेते आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी होत आहे. प्रशासनाने कामात सुसूत्रता आणण्यासाठी विशेष खिडक्यांची व्यवस्था केली आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
निवडणूक अर्जांच्या निमित्ताने होणारी गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी जळगाव शहर पोलिसांनी महापालिका आवारात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण गर्दी करणाऱ्यांना इमारतीबाहेरच रोखले जात असून, केवळ इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जात आहे.

इच्छुकांनी व्यक्त केला विश्वास
उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेल्या अनेक इच्छुकांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले. पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त करत, अनेकांनी आपला विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound