जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आले असतांना गणेश कॉलनी, स्वातंत्र्य चौक, सुभाष चौक आणि गणेश मार्केट मधील काही दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवून नियमांचे उल्लंघन केले. महापालिकेच्या पथकाने आज धडक कारवाई करत ९ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून दुकाने सील केली आहे.
अधिक वृत्त असे की, जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊनचे आदेश काढण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर मार्केटमधील दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आले आहे. आज महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने शहरातील गणेश कॉलनी, स्वातंत्र्य चौक, सुभाष चौक आणि गणेश मार्केट धडक कारवाई केली असता काही दुकाने उघडे असल्याचे दिसून आले तर काही दुकानदारांनी शटर बंद करून आत व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले. यातील गणेश कॉलनीतील चंदूलाल रसवंती, रोहिणी स्विटस मार्ट, शामजी स्वीट मार्टस, स्वातंत्र्य चौकातील दिलखुश मठ्ठा सेंटर, सुभाष चौकातील विरदाचंद धनराज बरडीया यांचे दुकान, आणि गणेश मार्केटमधील ज्योती कलेक्शन, रागुन साडीयाँ, बीएचआर टेक्सटाईल आणि निशा फॅशन साडी दुकान असे एकुण ९ दुकानांवर धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली असून दुकाने सील केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1091593654694514