अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड सहकारी संस्था सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. जगताप व सहाय्यक अधिकारी सुनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर करून नवनिर्वाचित चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांचा सत्कार याप्रसंगी संचालक मंडळासह केला.
याप्रसंगी मावळते चेअरमन मोहन सातपुते, व्हा.चेअरमन प्रदिप अग्रवाल, प्रविण जैन,भरत ललवाणी,पंडित चौधरी,अभिषेक पाटील, प्रविण पाटील,दिपक साळी,लक्ष्मण महाजन,सौ.वसुंधरा लांडगे,डॉ. मनिषा लाठी , अड.व्ही आर पाटील,विजय बोरसे ,बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील व कर्मचारी वृंद तसेच जळगांव जिल्हा बँक असोशिएशनचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनीही नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार केला.
यावेळी बँकेच्या परिसरात आयोजित सत्कार समारंभात बँकेचे माजी पदाधिकारी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील,माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, बँकेचे माजी चेअरमन गोविंद मुंदडे,खा.शि.मंडळ चेअरमन डॉ.संदेश गुजराथी, संचालक डॉ.अनिल शिंदे, हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, निरज अग्रवाल,अध्यक्ष जितेंद्र झाबक,माधुरी पाटील,अजय केले, लालचंद सेनानी, संध्या शाह,डॉ.शशांक जोशी, जितेंद्र जैन, भरत कोठारी, महावीर पहाडे , मा.नगराध्यक्ष सुभाष चौधरी, पांडुरंग महाजन, श्रीराम चौधरी, प्रविण पाठक,श्याम पाटील, संजय कौतिक पाटील,मनोज पाटील,नरेंद्र संदानशिव,प्रताप शिंपी, राजू फाफोरेकर,विनोद कदम, संभाजी पाटील,जितू,नांढा,गोहिल; अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव जितेंद्र ठाकूर, महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर अध्यक्ष समाधान मैराळे व सहकारी ,माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, गंगाराम महाजन, डॉ.रामदास शेलकर,ठाकूर समाज भावसार समाजाचे राज्य अध्यक्ष अरुण भावसार,चंद्रशेखर भावसार, अध्यक्ष दिलीप ठाकूर, अनिल ठाकूर, दिलीप जैन,प्रसाद शर्मा,हेमंत पवार, पु.साने गुरुजी ग्रंथालय चे अध्यक्ष दिलीप सोनवणे,सचिव प्रकाश वाघ, प्रा.सोमाणी, प्रा.देशमुख, प्रा.डॉ.लिलाधर पाटील, प्रा. संदिप नेरकर,प्रा.नितीन पाटील, प्रा.विजय तूंटे,प्रा.डॉ.धिरज वैष्णव,मिलिंद नवसारीकर,प्रदिप जैन, सुनिल चौधरी,प्रफुलचंद सिंघवी, विजय पाटील, डॉ.किरण पाटील,महेंद्रालाल कोठारी, दिपक गांधी, नितिन शाह,गिरीश भाई शाह, सुरेश सोनवणे, विवेक लाठी , गोपाळ सोनवणे, कुंदन साळुंके, आर्कीटेक आमोदकर, मुकुंद विसपुते,सत्तार मास्टर, बाळू पाटील,फिरोज पठाण, नबी पहिलवान, आरिफ भाया,सईद तेली,संजय शुक्ल,आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दि.अमळनेर को. ऑप.अर्बन बँक शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचित पदाधिकारी बँकेच्या सभासदांच्या व ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणार आहेत असा मनोदय नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी व्यक्त केला. बँकेच्या शतक महोत्सवी वर्षात वाटचाल करताना यंदाच्या वर्षी पुढील उपक्रमांची पायाभरणी होणार आहे. सदर कार्यक्रमास बँकेचे सन्माननीय सभासद, हितचिंतक ग्राहक , प्रतिष्ठित व्यापारी रोटरी क्लब , लायन्स क्लब, विविध समाज मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.