पुढील १६ वर्षांत मुंबई पाण्याखाली; संशोधन अहवाल समोर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आता समुद्राच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. बंगळुरू थिंक टँकच्या अहवालानुसार, 2040 पर्यंत मुंबईचा सुमारे 13.1% भाग समुद्रामध्ये बुडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबई शहरावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अहवालामध्ये केवळ हा एकच अंदाज वर्तवण्यात आलेला नाही, तर सत्य देखील सांगितले गेलेय जे जागतिक तापमानवाढीमुळे प्रकर्षाने समोर आले आहे.

बंगळुरू थिंक टँकच्या अहवालातील माहितीनुसार, समुद्र पातळी वाढणे हे भारतीय किनारपट्टीवरील शहरांसाठी धोकादायक ठरत आहे. ज्यावर काम करणे अतिशय आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील डेटा शोधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. लेटेस्ट आयपीसीसीमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ग्लोबल ट्रेंडमध्ये या कंपनीने ऐतिहासिक कालखंडातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक कल पाहून अभ्यास केला आहे. उत्सर्जनामध्ये जीवाश्म इंधनाचा समावेश अधिक असल्याचे आढळून आले. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मोठ्या प्रमामात नुकसान होण्याची शक्यता आहे.

पाणी पातळी वाढल्यानंतर मच्छीमार आणि जलचरांनाही मोठा फटका बसू शकतो. पायाभूत सुविधांमध्येही आपण कमकुवत पडू शकतो. याकरिता क्लायमेट लेबल आणि पाण्याशी संबंधित जोखमीकडे लक्ष द्यावे लागेल. या प्रभाग स्तरावरील अभ्यासामुळे आपण सक्षम होऊ शकतो तसेच लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेता येईल. अभ्यासानंतर इको सिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.

पाणी पातळी वाढणे हा आर्थिक राजधानीसाठी मोठा धोका असल्याचे पर्यटन तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन लाइन्स यासारखी पर्यटन स्थळे पाण्यात बुडल्यास पर्यटकांची संख्या कमी होईलच पण मुंबईची ओळखही नाहीशी होऊ शकते. अशा पद्धतीने समुद्राची पातळी वाढल्याने पर्यटन उद्योगास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अन्य देशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई एण्ट्री किंवा एक्झिट स्पॉट नक्कीच असते. परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यास लोक मुंबई वगळता अन्य शहरांतून विमान प्रवास करणे पसंत करतील. सरकार जसे रस्तेबांधणी आणि अन्य क्षेत्राकडे लक्ष देत आहे, त्याचप्रमाणे आता मुंबईच्या या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Protected Content