मुंबई प्रतिनिधी । मालाडमध्ये एका तरूणाने तरूणीवर गोळीबार करून नंतर स्वत:लाही संपविल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मालाडच्या पश्चिम भागात इन्फिनिटी मॉलजवळ रात्री नऊच्या सुमारास एका प्रियकराने प्रेयसीवर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला असून, त्यानंतर प्रियकरानंही स्वतःला गोळी झाडून संपवलंय. २२ वर्षांची ही प्रेयसी गोळीबारात जागीच ठार झालीय. तर २५ वर्षांच्या प्रियकराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यातील तरूणाची ओळख पटली असून, त्याचं नाव राहुल यादव असल्याचं समजतंय. देशी कट्ट्यातून ही गोळी झाडण्यात आली असून, ते दोघेही कांदिवलीच्या आसपासचे रहिवासी आहेत. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
या भयंकर घटनेची माहिती मिळताच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाड येथील गोळीबाराच्या घटनास्थळाला भेट दिली असून, प्रकरणाची माहिती घेतली.