मुंबई प्रतिनिधी । मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असणारे एपीआय सचिन वाझे यांचा सहकारी जमीर काझी याला देखील आज अटक करण्यात आली आहे.
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने त्यांची कसून चौकशी केली असून यात अनेक नवीन बाबींचा उलगडा झाला आहे. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाझेंचे सहकारी एपीआय रियाझ काझी यांची चौकशी केली होती. यात काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे.
रियाझ काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेंनी सीआययू पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. यातच आता वाझे यांच्या पाठोपाठ काझी यांनाही अटक करण्यात आली आहे.