Home न्याय-निवाडा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने ओढले ताशेरे

मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने ओढले ताशेरे

0
39

मुंबई प्रतिनिधी । कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येवरून आज उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

डॉ. दाभोलकर आणि कॉमे्रड पानसरे यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात याचिका सादर केल्या आहेत. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पानसरे हत्याप्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असल्याने कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पानसरे हत्याप्रकरणात महाराष्ट्र एसआयटी अजूनही खर्‍या सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकली नाही. तपासही संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गृहखाते सांभाळणारे फडणवीस यांना कोर्टाने ताशेरे ओढले. कनिष्ठ अधिकार्‍यांना तपासात अपयश येतं तेव्हा वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यात लक्ष घालायला हवे. फरार आरोपींवरील बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याने लोक आरोपीला पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच असते, असेही न्यायालयाने सुनावले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound