अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे गावातील पाझर तलावासाठी निधीची तरतूद केल्यामुळे उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा सत्कार केला.
कळमसरे उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी राम नाम पाझर तलावासाठी कळमसरे विकास मंचाचे पदाधिकारी, मारवड विकास मंचाचे व कळमसरे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने पाठपुरावा केला होता. याला आमदार स्मिताताई वाघ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पाठबळ मिले. यामुळे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी या पाझर तलावासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. या पाझर तलावामुळे भविष्यात शेती सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुरलीधर महाजन यांच्यासह लोकप्रिय किर्तनकार हभप जळकेकर महाराज, हिरालाल सैंदाणे आदी उपस्थित होते.