मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमिवर खडसे कुटुंबाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबाने मुक्तईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील जमीनीतून अवैध गौणखनिज उपसा करून चारशे कोटी रूपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यांनी या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. यावर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ एसआयटी चौकशीची मागणी मान्य केली होती.
यानंतर आता सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर इतक्या जमीनीवरील अवैध उपशाबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटीची चौकशी करण्यात आली असून याबाबतचे वृत्त साम टिव्ही या वाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आली असून ही समिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार आहे. यामुळे एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.