मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ९ ऑगस्ट गुरूवार रोजी आज मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटावी म्हणून मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांच्या आढावा बैठकीचा अहवाल नाना पटोले यांना सादर करण्यात आला.
मुक्ताईनगर विधानसभेसाठी ही जागा काँग्रेसला लढण्यासाठी नाना पटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून तुम्ही तयारी चालू ठेवा आम्ही मुक्ताईनगर विधानसभेची मागणी निवड समितीतर्फे केलेली आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भाऊ पाटील व मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र जाधव उपस्थित होते.