Muktainagar मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत मुक्ताबाई वारीची सांगता आज होत असून यानिमित्त भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडलेली संत मुक्ताईची वारी यंदा उदंड उत्साह आणि चैतन्यदायी वातावरणात पार पडली. संत मुक्ताबाई पालखी सोहळा विठूरायाचे दर्शन घेवून ६१दिवसाचा १४०० किलोमीटरचा पायी प्रवास करित स्वगृही परतणार असल्याने या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
रविवारी रात्री उशिरा संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आगमन तरोडा मार्गाने नविन मंदिरात झाले. संस्थान चे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील व विश्वस्त भाविकांकडून स्वागत करण्यात आले. संत मुक्ताबाई विश्वस्त मंडळाकडून दोन्हीबाजूने पायी वारकर्यांचा पंचवस्त्र देवून सन्मान करण्यात आला. अजित जैन यांच्यातर्फे स्टील किटली भेट दिली. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले.
दरम्यान, यंदा पालखी सोहळा समाप्तीच्या दिवशी भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी ६५ दिंड्यांनी सहभाग नोंदविला आहे. सकाळी १० नवे मंदिर येथे आ.एकनाथराव खडसे, आ.चंद्रकांत पाटील, रवींद्रभैय्या पाटील, तहसीलदार श्वेता संचेती , मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, प्रभारी नगराध्यक्षा मनिषा पाटील आदी मान्यवरांचे हस्ते पालखी पूजन होवून दिंडी मिरवणूक स्पर्धा आरंभ होईल .विसावा पादूका,मुक्ताई चौक, बस स्टन्ड, परिवर्तन चौक,भुसावळ रोड,गजानन महाराज मंदिर मार्गे, मुळमंदिरात येईल हभप. रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन व बक्षीस वितरण होईल.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्य पुरूषोत्तम वंजारी ,श्रीकांत पाटील, उमेश राणे, सदाशिव पाटील, विशाल सापधरे,निवृत्ती पाटील, पुंजाजी झोपे, उध्दव जुनारे परिश्रम घेत आहे..