मुक्ताईनगर प्रतिनिधी | क्षुल्लक वाद विकोपाला गेल्याने एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील निमखेडी येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, विजय दिनकर डहाके (वय ४०, रा. निमखेडी) याचे आज सायंकाळी तालुक्यातील सारोळा येथील काही जणांनी किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे सहा-सात जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला.
या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर मयत विजय डहाके यांचे पार्थिव हे शवविच्छेदनासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.