मुक्ताईनगरच्या छेडखानी प्रकरणात ॲड. केतन ढाके विशेष सरकारी वकील !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील छेडखानी प्रकरणात ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात आली असून आज याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

मुक्ताई यात्रा सुरू असतांना कोथळी येथे दोन तरूणींची छेडखानी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या कन्येचा समावेश असल्याने सर्वत्र हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणातील तीन संशयित आरोपी हे अजून देखील फरार आहेत.

दरम्यान, आज या प्रकरणात ॲड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरूडे यांनी जारी केले आहेत. ॲड. ढाके यांच्या नियुक्तीमुळे मुक्ताईनगर येतील छेडखानी प्रकरण हे जलदगतीने चालण्याची शक्यता बळावली आहे.

Protected Content