मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांचं मातृत्व  संपूर्ण  भारतास लाभले यांची जयंती व संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती व आध्यात्म ची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती मुक्ताईनगर तालुका काँग्रेस व महिला कॉंग्रेसतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसिफ खान, मागास सेल जिल्हा उपाध्यक्ष बीड गवई , तालुका उपाध्यक्ष दिनकर भालेराव, मुक्ताईनगर शहराध्यक्ष पवन खूरपडे, संजय पाटील, युवक अध्यक्ष अतुल जावरे, तालुका सचिव निलेश पाटील, एडवोकेट कुणाल गवई, निखिल चौधरी, आनंदा कोळी, संतोष कोळी ,दीपक चौधरी, पवन कांडेलकर, अनिल सोनवणे, शकील आजाद अभिमन्यू घोगरे. तसेच महिलांमध्ये  विजयाताई पाटील,  सुमनताई चौधरी,  माधुरीताई जाधव,  शरीफा नासिर खान,  उषाताई मराठे,   मनीषाताई जावरे,  उषाताई झांबरे,  अनिताताई कोळी,  अलका गुरचळ, कांचनताई गवई यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content