Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर भाजपा प्रचाराला वेग; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रभागवार कॉर्नर बैठकांनी...

मुक्ताईनगर भाजपा प्रचाराला वेग; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रभागवार कॉर्नर बैठकांनी निवडणुकीत रंगत

0
161

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची आक्रमक मोहीम सुरू केली असून, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकींना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्ष पदापासून ते प्रभागनिहाय उमेदवारांपर्यंत भाजपच्या संपूर्ण पॅनेलसाठी हा प्रचार निर्णायक ठरत असल्याचे दिसत आहे.

प्रचार मोहिमेअंतर्गत रक्षाताई खडसे यांनी प्रभाग क्रमांक २, ३, ४, ५, १० आणि ११ मध्ये सलग दौरे करून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या बैठकींमध्ये त्यांनी प्रभागातील विकासकामे, आगामी नियोजन तसेच भाजपच्या धोरणांची माहिती मतदारांना दिली. नागरिकांनी समस्यांची मांडणी केल्यावर रक्षाताईंनी त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या थेट संवादामुळे भाजपा उमेदवारांना मोठा उत्साह प्राप्त झाल्याचे चित्र प्रभागनिहाय दिसून आले.

नगराध्यक्ष पदासाठी भावना ललित महाजन या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या समर्थार्थ झालेल्या बैठकीत महिलांचा खास उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. त्याचबरोबर प्रभाग २ मध्ये नईम बिसमिल्ला बागवान, प्रभाग ३ मध्ये अतिक अहमद हमीद खान, प्रभाग ४ मध्ये जावेद अख्तर खान, प्रभाग ५ मध्ये आसिया ऐजाज खान, प्रभाग १० मध्ये निलोफर बी. युनुस खान आणि प्रभाग ११ मध्ये जुबेर निसार शाह हे उमेदवार नागरिकांना भेटून आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देत आहेत.

प्रचारादरम्यान रक्षा खडसे यांनी मतदारांना भाजपा उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे भाजपा पथकाचा आत्मविश्वास वाढताना दिसत असून, पक्षाने निवडणूक लढाईत गती मिळविल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.


Protected Content

Play sound