मुक्ताईनगरातील ‘ते’ आरोपी विशिष्ट पक्षाचे; कठोर कारवाई करणार ! : मुख्यमंत्री

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरात घडलेला छेडखानीचा प्रकार धक्कादायक असून यात एका विशिष्ट पक्षाशी संबंधीत आरोपी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची कन्या व अन्य मुलींची मुक्ताईनगरात छेडखानी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.

या संदर्भात फडणवीस म्हणाले की, आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत, ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काहींना अटक केली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Protected Content