Home राजकीय काँग्रेस आमदारांच्या इनकमिंगसाठी मुख्यमंत्र्यांचा नकार !

काँग्रेस आमदारांच्या इनकमिंगसाठी मुख्यमंत्र्यांचा नकार !

0
30
fadnavis vikhe patil
fadnavis vikhe patil

fadnavis vikhe patil

मुंबई प्रतिनिधी । विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील दहा-एक आमदार लवकरच भाजपत जाणार असल्याच्या बातम्या सर्वत्र सूरु आहेत. मात्र भाजपमधूनच विखेंच्या नेतृत्वातील आयातीला खो दिला जात असून, भाजपत यायचे असेल तर वैयक्तिक चर्चा करा, असा निरोप काँग्रेसच्या इच्छुक आमदारांना दिला जात असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे अलिकडे अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून आले. स्वत: विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन विखे भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अब्दुल सत्तार, भारत भालके, सुनील केदार, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर असे काही आमदार विखे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश करणार असल्याच चर्चा समोर येत आहेत. मात्र, खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, विखे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांना भाजपात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल नाहीत. त्यामुळेच विखे यांनी त्या आमदारांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसच्या आमदारांना भाजपात घेतल्याने राजकीय भवितव्याचे हमी असणार. त्याबाबत भाजपच्या नेतृत्वाशी मी बोलू शकतो, असे या आमदारांना वाटत असल्याने ते माझ्या संपर्कात आहेत. याचा अर्थ, मी त्यांचे नेतृत्व करीत आहे, असा होत नसल्याचे विखे यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. भाजपात प्रवेश करणा-या आमदारांनी मुख्यमंत्री यांच्याशी वैयक्तिकरीत्या बोलत असल्याची माहिती आहे. जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार, भारत भालके, कालिदास कोळंबकर आदी आमदारांशी मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. त्यांना कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. मुख्यमंत्री म्हणतील तसा निर्णय मी घेईन, असे कोळंबकर यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound