जळगाव प्रतिनिधी । मु. जे महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन सहा जणांनी मुकेश सपकाळे नामक तरुणाचा खुन केला होता. या प्रकरणी पोलीसांच्या ताब्यात असलेले सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहाही जणांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली.
एम.जे. कॉलेजमध्ये आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे (वय २१) या तरूणाचा शनिवारी 30 जून रोजी खून करण्यात आला होता. किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या या क्रूर हत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. असून शैक्षणिक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
इच्छाराम पुंडलिक वाघोदे (वय 22, रा.समतानगर), किरण अशोक हटकर (वय 20, रा. नेहरुनगर), अरुण बळीराम सोनवणे (वय 23, रा. आंबेडकर चौक, समता नगर), मयुर अशोक माळी (वय 18, रा. जाकीर हुसेन कॉलनी, महाबळ), समीर शरद सोनवणे (वय19 रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंगरोड) व तुषार प्रदीप नारखेडे (वय 19, यशवंत नगर) या सहा मारेक-यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.