Home Cities जळगाव मुफ्ती हरून नदवी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुफ्ती हरून नदवी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश


जळगाव (प्रतिनिधी) येथील समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्ध्यक्ष तथा प्रसिद्ध मुस्लीम धर्म गुरु मुफ्ती हरुन नदवी यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुफ्ती हे काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे वृत्त होते.

जळगाव जिल्हा कॉंग्रेस भवनात आज दुपारी मुफ्ती हरून नदवी यांनी आज कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुफ्ती साहेब हे मुसलीम धर्म गुरु असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. वर्षभर त्यांचे देशभरात प्रवचन होत असतात. त्यामुळे ते तरुणानांसह मुस्लिम धर्मातील प्रत्येक वयोगटात लोकप्रिय आहेत. मुफ्ती नदवी यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात कॉंग्रेसला मोठे बळ मिळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुफ्ती नदवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound