Home Cities अमळनेर भोरटेक शेतशिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

भोरटेक शेतशिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह


Crime 21

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भोरटेक शिवारातील एका शेतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञाात व्यक्तीच्या मयत झाल्याबाबत मारवड पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, अमळनेर तालुक्यातील भोरटेक गावाच्या शेतशिवारात एका 45 ते 50 वयोगटातील पुरूषाचा मृतदेह आढळून आला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. मयताच्या गळ्यात माळ, लाल दोऱ्यांमध्ये पेटी, उजवा हात आणि उजवा पायात काळ्या दोरा बांधलेला आहे. ओळख पटविण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी मारवड पोलीसाना माहिती कळवावे असे आवाहन मारवड पोलीसांकडून करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound