Home Cities जळगाव जळगाव-पाचोरा रस्त्यावर बुंध्याला आग लावून दोन झाडे जाळली (व्हिडीओ)

जळगाव-पाचोरा रस्त्यावर बुंध्याला आग लावून दोन झाडे जाळली (व्हिडीओ)

cb2859df f98c 494d a4f2 6a995ff93823
cb2859df f98c 494d a4f2 6a995ff93823

cb2859df f98c 494d a4f2 6a995ff93823

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव-पाचोरा रस्त्यावर पाथरी आणि वावडदा गावांच्या दरम्यान आज भरदुपारी एका शेताच्या बांधाजवळ दोन झाडांना बुंध्याला आग लावून त्यांना पेटवून दिल्याचे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या टीमला योगायोगाने दिसून आले.

 

आपल्या कुठल्यातरी स्वार्थासाठी अशाप्रकारचे उद्योग करणारी टोळी पुन्हा कार्यरत झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. आपल्या किरकोळ स्वार्थासाठी डेरेदार आणि हिरवेगार वृक्ष जाळून टाकणे, पर्यावरणाची अक्षम्य हानी असून त्याचे दुष्परिणाम सगळ्या मानव जातीला भोगावे लागणार आहेत. एकीकडे झाडे लावणे, पाणी वाचवणे, असे कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरातून व शासकीय पातळीवरही धडाक्यात घेतले जात असताना अशा समाज आणि पर्यावरण विघातक कारवाया करणार्‍या कंट्कांवर काय कारवाई केली जाते, याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound