
कासोदा ता. एरंडोल (वार्ताहर) येथील ग्रामस्थांतर्फे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणूक निकालानंतर खासदार उन्मेष पाटील हे माऊली लहान मुलांचे हॉस्पीटलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पहिल्यांदाच कासोद्यात आले होते. यावेळी ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत फटाके फोडत खा.पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नरेश ठाकरे, उमेश नवाल, नरेंद्र पाटील यांनी फुल-हार घालून उन्मेष पाटील यांचे स्वागत केले. या प्रसंगी एरंडोल- पारोळा मतदार संघाचे आमदार सतीश पाटील, मा.आ.चिमणराव पाटील , माजी जि.प. उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, ज्ञानेश्वर आमले पाटील , रविंद्र पाटील, वाल्मिक ठाकरे, आबासाहेब राजपुत, गणेश पाटील,कैलास(बाबा), स्वप्नील चौधरी यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते