अमळनेर (प्रतींनिधी) पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी करूनच खासदारकीच्या कामाचा शुभारंभ करीत आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटील यांनी पाडळसरे धरणाला आज जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह दिलेल्या भेटीप्रसंगी केले. यावेळी निम्न्न तापी पाडळसरे धरण प्रकल्पच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणुकीत पाडळसरे धरणाच्या प्रश्नावर धरण जनआंदोलन समितीने उग्र आंदोलन उभारले होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात खासदारपदाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना धरणाचा प्रश्न अभ्यासपूर्वक मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनीही प्रचार सभेचे जाहीर आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर आज खा. उन्मेष पाटील प्रथमच येथे येत असल्याने त्यांचे स्वागत धरण जनआंदोलन समितीच्या वतीने पदाधिकारी सुभाष चौधरी, प्रा.शिवाजीराव पाटील, अजयसिंग पाटील, रणजित शिंदे, देविदास देसले, प्रशांत भदाणे, हिरामण कंखरे, रवी पाटील, सुनील पवार, सौ.वसुंधरा लांडगे, आबा देसले, एस.एम.पाटील, सुपडू बैसाणे, पाटील आदिनी केले.
खा. पाटील यांनी लगेचच पाडळसरे धरणावर भेटीसाठी जनआंदोलन समितीच्या पदाधिकार्याना सोबत घेतले. शेतकऱ्यांच्या व लोकांच्या भावनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री संवेदनशील असून धरणाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधिल आहे. असेही यावेळी जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्याशी व ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेनंतर खा.पाटील यांनी स्पष्ट केले. समितीचे सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, अजयसिंग पाटील, रणजित शिंदे, प्रशांत भदाणे, देविदास देसले, पत्रकार वसंतराव पाटील, स्थानिक पुनर्वसन समितीच्या ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी धरणाच्या कामाबाबत विचारणा केली.
याप्रसंगी निम्न्न तापी प्रकल्पच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांच्याकडून खासदारांनी आजपर्यंत मिळालेल्या निधींबाबत माहिती घेतली तर मिळणाऱ्या अत्यल्प निधीतून पुढिल ५० वर्षे धरणपूर्ती अशक्य आहे, म्हणून केंद्रातून योजनेचा लाभ घेऊन धरणपूर्ती शक्य आहे. यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समिती, शेतकरी, आ.शिरीष चौधरी व मित्र परिवार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना गटतट न पाहता सोबत घेऊन प्रयत्न करणार, असे यावेळी जाहीर केले. याप्रसंगी माजी आ.डॉ.बी.एस.पाटील, जि.प.सदस्या मीनाताई पाटील, अड.व्ही.आर.पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.