नवीदिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. अधिवेशनात पहिले तीन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा चालणार आहे. आज पहिल्या दिवशी शपथ घेणाऱ्या खासदारात रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा समावेश असून त्यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.