Home Cities मुक्ताईनगर श्रीराम मंदिर भूमिपुजनाचे खासदार रक्षा खडसे यांनी केले स्वागत

श्रीराम मंदिर भूमिपुजनाचे खासदार रक्षा खडसे यांनी केले स्वागत

0
31


मुक्ताईनगर प्रतिनिधी । आज अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचा शीलान्यास पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला असून याचे खासदार रक्षाताई खडसे यांनी स्वागत केेले आहे.

आज अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा शीलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आला. या ऐतिहासीक घटनेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. या अनुषंगाने रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी याचे स्वागत केले आहे. श्रीराम मंदिराचे भूमिपुजन होत असतांना त्यांना सालबर्डी येथील राम मंदिरात जाऊन पूजन केले. आपण ऐका ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होत असून आपण याचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया खासदार रक्षाताई खडसे यांनी याप्रसंगी दिली.


Protected Content

Play sound