भुसावळ (प्रतिनिधी ) अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे. विकासाच्या झऱ्यांचा पाझर समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत नेणे हे अंत्योदयाचे मूळ तत्व आहे. ही नाळ तोडायची नाही हीच खासदार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून ही माझी बांधिलकी आहे. पंतप्रधान मोदीच्या कर्तव्य पथातील स्वच्छता अभियान, दिव्यांग प्रज्ञाचक्षू कल्याण, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वल गॅस योजना अशा सगळ्याच ध्येयांना दृष्य आकार देण्यासाठी खासदार म्हणून माझे योगदान दिलेले असल्याने मी जनतेची चौकीदार आहे असे प्रतिपादन रक्षाताई खडसे यांनी केले.
त्या भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार म्हणून मलकापूर तालुक्यातील दसरखेड, विवरे या गावात झालेल्या प्रचारात बोलत होत्या. याप्रसंगी उपस्थित विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष चैनसुख संचेती, मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल संचेती, रावेर लोकसभा संयोजन समिती सहसंयोजक माधवराव गावंडे, रावेर लोकसभा संयोजन दौरा सहप्रमुख मोहन शर्मा, तालुकाध्यक्ष दादाराव तायडे, शिवसेना शहराध्यक्ष विजय नवले, शहराध्यक्ष राम झांबरे, पंस सभापती संगीता दादाराव तायडे, जिप सदस्य केदार ऐकडे, पंस सदस्य संजय काजळे, मलकापूर कृउबा समिती सभापती साहेबराव पाटील, माजी जिप सदस्य विलास पाटील, बोदवड कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, राम शर्मा, राजू खरारे, मुक्ताईनगर नगरसेवक ललित महाजन, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.