मंत्रीपदावरून भावना गवळी नाराज ; शपथविधी सोहळ्याकडे पाठ

bhavna gawli

यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केलीय. परंतु तरी देखील मंत्रीपदापासून लांब ठेवल्यामुळे त्या नाराज असून मोबाईल बंद ठेवत त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे कळते.

 

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमधून फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी नाराज झाल्याची माहिती आहे. अगदी त्यांनी आपला फोन देखील बंद करून ठेवला आहे. शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं जातं याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर अरविंद सावंत यांची लॉटरी लागली. सलग पाचव्यांदा निवडून आल्यानंतरही भावना गवळी यांना डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढली असल्याची चर्चा आहे.

Add Comment

Protected Content