यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी विकसित महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वात हा प्रभावी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पात मेगा रिचार्ज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख असून, हा प्रकल्प कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वपूर्ण आणि यशस्वी पाऊल आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
यासोबतच, या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांचे देखील रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी विशेष आभार मानले आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे जिल्ह्यातील जलसंधारण आणि शेती विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल. आमदार अमोल जावळे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “हा प्रकल्प आमच्या जिल्ह्यासाठी एक सुवर्णसंधी असून, शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी नवा आशेचा किरण आहे.”