जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील बदलापूर येथील तीन वर्षाच्या दोन विद्यार्थींनींवर शाळेच्या शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव महापालिकेसमोर आंदोलन करत घटनेचा निषेध करण्यात आला.
बदलापूर येथील तीन वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा करावी, कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. राज्यातील महिला व मुली सुरक्षित नाही. त्यांना पंधराशे रुपयाची गरज नसून त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर व्यापारी आघाडी महानगरप्रमुख पुनम राजपूत, किरण भावसार, यश सपकाळे, अमोल मोरे, .शोएब खाटीक, सलीम खाटीक, कलीम खान, मोसिन शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.