Home क्राईम नेहरू नगरात शोककळा : तरूणाचं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट !

नेहरू नगरात शोककळा : तरूणाचं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट !

0
165

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू नगर भागात राहणाऱ्या एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. शुभम संजय मराठे (वय-२७) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शुभम मराठे हा त्याचे आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत नेहरू नगरात वास्तव्याला होता. मोहाडी रोडवर त्यांचे ‘मराठा हॉटेल’ असून, तो हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. व्यवसायाने तरुण आणि मनमिळाऊ असलेल्या शुभमने अचानक आत्महत्या केल्यामुळे परिसरात आणि मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शुभमने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. त्याचे वडील वरच्या खोलीत गेले असता, त्यांना शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी तत्काळ इतरांना बोलावले.

काही तरुणांच्या मदतीने शुभमला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

शुभमच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस त्याच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound