यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील विरावली ते कोरपावली या रस्त्यावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर झालेल्या धडकेत ४ जण जखमी झाले आहेत. जखमीतील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडुन सांगणयात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील विरावली ते कोरपावली या रस्त्यादरम्यान आज दिनांक २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन मोटरसायकलींनी एकमेकांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात विरावली येथील प्रमोद गणेश पाटील (वय २८) पवन भागवत पाटील (वय २५,रा. विरावली ता. यावल) व कोरपावली येथील किसन कडू अडकमोल (वय२५) व फकीरा बिऱ्हाडे (वय ५८) हे जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून नागरीकांच्या मदतीने जखमींना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी किरण जगताप यांनी तात्काळ जख्मींवर औषधपचार केले. यातील पवन भागवत पाटील व प्रमोद गणेश पाटील आणि किसन कडु अडकमोल यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवीण्यात आले आहे.