रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल पकडली आहे. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला आहे. सदर डिंक वन विभागाने जप्त केला आहे.
या बाबत वृत्त असे की, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर (प्रा) यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर वनक्षेत्रातील परिमंड अहिरवाडी मधील नियतक्षेत्र पडल्या मधील कं. नं. ०३ मध्ये गस्त करीत असताना एक मोटार सायकल एम.पी १२ बीए ७२०२ सी.टी.१०० कंपनीची ही अवैध सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली. त्यात साधारण वीस किलो सलई डिंक जप्त केला असून सदर आरोपी सलई डिंक व मोटार सायकल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
आरोपीचा पाठलाग केला असता आरोपी मिळून आला नाही, तरी सदरचा वन गुन्हा हा वनरक्षक पाडले खु. यांच्या प्र.रि.क्रं ०१/२०२४ दि.२९ नोंदविला असून या सलई डिंक वीस किलो असून डिंकाची किंमत २ हजार २०० रुपये इतकी असून मोटारसायकल एकची बाजारभाव अंदाजीत रक्कम- २५ हजार रुपये इतकी आहे. तरी सर्व मिळून ऐकून रक्कम २७ हजार २०० इतकी आहे. तरी सदरची कार्यवाही ही अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनरक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक रमेश भुतेकर यांचा सहभाग होता. सदरची कार्यवाही ही उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर वन गुन्ह्याबाबत पुढील तपास वनपाल अहिरवाडी यांचे मार्फत सुरू आहे.