
नाशिक (वृत्तसंस्था) आज सकाळी नाशिक येथे चौघांना विजेचा जोरदार धक्का लागला. यात सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगा आणि मुलगीची प्रकृती गंभीर आहे.
नाशिक येथील उत्तमनगर परिसरातील रहिवाशी सोजाबाई केदारे या आज सकाळी आपल्या घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालत होत्या. यावेळी अचानक त्यांचा धक्का विजेच्या तारेला लागला आणि त्यांना शॉक बसला. हे पाहून मदतीसाठी धावून गेलेल्या सुनबाई सिंधू केदारे यांनाही शॉक लागला. आजी आणि आईला विजेचा शॉक लागल्याचे पाहून मुलगी राणी केदारे त्यांना वाचवण्यासाठी गेली. मात्र तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर मुलगा शुभमच्या हे लक्षात येताच तोही मदतीसाठी धावला. पण त्यालाही विजेचा धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेत आजी आणि आईचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा आणि मुलगी गंभीर भाजले आहेत. या दोघांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.